Wednesday, March 18, 2015

Gori Gori Pan Fulasarakhi Chan,Balgeet,Marathi Song


 
गोरी गोरी पान फुलांसारखी छान
दादा मला एक वहिनी आण

गोर्या गोर्या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्याच्या पदराला बिजलीचा बाण

वहिनीला आणायला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान

वहिनीशी गट्टी होता तुला फोन थापा
तुला दोन थापा तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्या परी होऊ दोघी आम्ही सान

No comments:

Post a Comment