Wednesday, March 18, 2015

"Ekati Ekati Ghabarlis Na" - Chintoo,Balgeet,Marathi Song


एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई 
म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही 

आली होती जाम झोप गुडूप झालो असतो 
भीती बीती कसली थेट उद्याच उठलो असतो 
मात्र वाटलं आपल्यापुरता विचार बरा नाही 
मी आहे शूर माझी आई तशी नाही 

खिडकी वाजली नुसती तरी धडपडून उठेल
घाबरून जाईल अंधारात रडतबिडत बसेल 
म्हणून आलो आता काही घाबरायाचं नाही 
कुशीत घेऊन झोप मला म्हणजे काळजी काही 
 
बर झालं आलास सोन्या काही खोटं नाही 
कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई 
विचारांनी साऱ्या कसं गलबलायला होतं
अंधार असतो फार मोठा, पिल्लू असतं छोटं
नाजूक नाजूक त्याचा जीव, नाजूक नाजूक मन 
कोवळी काच सोसेल कसे भविष्याचे घण
लहान आहेस तोवर निदान कुशीत घेता येईल 
मोठा होशील उडून जाशील तेव्हा काय होईल 
कोण असशील कुठे असशील करशील काय तेव्हा 
लहान होऊन कुशीमध्ये शिरशील  काय तेव्हा 
माझा आहेस अजून ये रे माझ्यापाशी राहा 
अंगाईच्या कुशीमध्ये छान स्वप्न पहा 
मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही 
कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई  

No comments:

Post a Comment