Thursday, March 19, 2015

Chimna Chimnicha Lagin - Balgeet-Marathi Song


चिमणा चिमणीच लगीन........२
तिथे वऱ्हाडी कोण कोण

कावळा म्हणे मी सोंगाड्या
वाजवीन भो  भो  भोंगा
चिमणा चिमणीच लगीन........२

मैना म्हणे मी माळीन
टोपलीभर फुले मी आणीन
चिमणा चिमणीच लगीन........२

पोपट म्हणे मी भाट
मंत्र म्हणेन पाठ
चिमणा चिमणीच लगीन........२

मोर म्हणे मी नर्तक
करेन थुई  थुई नाच 
चिमणा चिमणीच लगीन........२

कोंबडा म्हणे मी अचारी
लाडू वाढेल दुपारी
चिमणा चिमणीच लगीन........२
तिथे वऱ्हाडी कोण कोण ........२
चिमणा चिमणीच लगीन........२

No comments:

Post a Comment