Wednesday, March 18, 2015

Marathi song, Balgeet - Chadi Lage Chham Chham

 
छम्‌ छम्‌ छम्‌ , छम्‌ छम्‌ छम्‌
छडी लागे छमछम, विद्या येई घमघम
छम्‌ छम्‌ छम्‌ , छम्‌ छम्‌ छम्‌

मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल
दंतोजींचा पत्‍ता नाही, खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम 
छम्‌ छम्‌ छम्‌ ...

तंबाखूच्या पिचकार्‍यांनी भिंती झाल्या घाण
पचापचा शिव्या देई खाता खाता पान
'मोर्‍या मूर्खा' , 'गोप्या गद्ध्या', देती सर्वा दम
छम्‌ छम्‌ छम्‌ ...

तोंडे फिरवा, पुस्ती गिरवा, बघू नका कोणी
हसू नका, रडू नका, बोलू नका कोणी
म्हणा सारे एकदम, ओ नमः सिद्धम्‌
छम्‌ छम्‌ छम्‌ ...


No comments:

Post a Comment