Wednesday, March 18, 2015

Maina Rani Chatur Shahani,Balgeet,Marathi song


मैनाराणी, चतुर शहाणी, सांगे गोड कहाणी
कहाणीत त्या पशुपक्ष्यांना अवगत असते वाणी

सिंह वनाचा असतो राजा, भिती त्याची चित्ती
वाघ वागतो भिऊन त्याला, गुडघे टेकी हत्ती
अति चतूर पण कोल्हा कोणी, सिंहा पाजी पाणी

कोल्ह्याचाही काढी काटा कोणी करकोचा
घरी बोलावुन पाण‍उतारा करी पाहुण्याचा 
कडीवरी त्या कडी करुनिया, टोला कोल्हा हाणी

शाल म्हणुनिया खाल पांघरे गाढव वाघाची
त्यास पाहता झोप उडाली जंगल भागाची
एक कोंबडा उघडकीस पण ढोंगच त्याचे आणी

No comments:

Post a Comment