एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख होते कुरुप वेडे, पिल्लू तयात एक कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे सर्वाहूनी निराळे ते वेगळे तरंगे दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी ? जे ते तयास टोची, दावी उगाच धाक आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक एके दिनी परंतू, पिल्लास त्या कळाले भय वेड पार त्याचे, वार्यासवे पळाले पाण्यात पाहताना, चोरुनिया क्षणैक त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक
Eka talyat hoti badake pille surekh
Lyrics : G D Madgulkar
Singer: Asha Bhosale
No comments:
Post a Comment