एक कोल्हा बहु भुकेला, फार होता कावला एक तुकडा परि न त्याला, खावयासी गावला बापड्याने जंगलाचा भाग सारा धुंडला भर दुपारी तो बिचारा दीनवाणा हिंडला शेवटाला थकुन गेला सावलीला थांबला उंच होते झाड त्याला उंच शेंडा कोवळा बसुन वरती खाऊ खाई एक काळा कावळा चोचीमध्ये मांस धरुनी चाखितो तो मासला मारुनिया हाक त्यासी गोड कोल्हा बोलला एक गाणे गा मजेने, साज तुमचा चांगला कोकिळेचे आप्त तुम्ही, घरीच त्यांच्या वाढला मुर्ख वेड्या कावळ्याने रागदारी मांडली चोचीमधली चीज त्याच्या त्वरित खाली सांडली धावला कोल्हा सुखाने घास त्याने सेविला
Wednesday, March 18, 2015
Ek Kolha Bahu Bhukela ,Balgeet,Marathi Song
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment