Wednesday, March 18, 2015

Aai Bagh Na Kasa Ha Dada,Balgeet,Marathi song


आई बघ न कसा हा दादा 
मला चिडवायचं हाच याचा धंदा 

बाहुलीचं लग्न लावता आम्ही 
म्हणतो नवरदेव आहे मी 
आता मलाच मुंडावळी बांधा 

मोठे मोठे करतो डोळे 
कधी उगाच विदुषकी चाळे 
भारी खट्याळ नाही मुळी साधा 

दादा भलताच द्वाड आहे आई 
खोड्या करून छळतो बाई 
याला ओवाळायची नाही मी यंदा

No comments:

Post a Comment